पाचव्या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी गूड न्यूज, : तामिळनाडू एक्सप्रेस टीममध्ये दाखल

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१९ मार्च ।अहमदाबाद ।ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असताना या खेळाडू दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पाठवण्यात आले होते. त्यानंतर हा खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त झालेला आहे. या खेळाडूने फिटनेस टेस्टही पास केली आहे. त्याचबरोबर क्वारंटाइनचा कालावधी संपवून हा खेळाडू आता भारतीय संघात दाखल झाला आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज टी. नटराजनला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात असताना दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि त्याला पुनर्वसनसासाठी बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पाठवण्यात आले होते. आता नटराजन पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. त्याचबरोबर त्याने फिटनेस टेस्टही पास केली आहे. त्यामुळे चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्याच्यावेळी नटराजन हा संघाबरोबर असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे आता पाचव्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी नटराजनचा विचार केला जाऊ शकतो. भारत आणि इंग्लंड यांच्यासाठी पाचवा ट्वेन्टी-२० सामना हा निर्णायक असेल. कारण हा सामना जो संघ विजयी ठरेल त्यांना मालिका जिंकता येणार आहे.

सध्याच्या घडीला भारतीय संघातील वेगवान गोलंदाजीची धुरा भुवनेश्वर कुमार आणि शार्दुल ठाकूर हे दोघे सांभाळत आहेत. आतापर्यंतच्या ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाजांना चांगली मदत मिळत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे पाचव्या सामन्यासाठी एका वेगवान गोलंदाजाची निवड भारतीय संघात होऊ शकते, असे म्हटले जात आहे. त्यामुळे आता नटराजन पूर्णपणे फिट झाला असून त्याच्या नावाचा विचार नक्कीच पाचव्या ट्वेन्टी-२० सामन्याच्या संघ निवडीसाठी केला जाऊ शकतो. त्याचबरोबर संघात दीपक चहर हादेखील एक वेगवान गोलंदाज आहे. त्यामुळे पाचव्या सामन्यासाठी नेमकी कोणाला संधी मिळते, याची उत्सुकता सर्वांनाच असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *