महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२० मार्च । पिंपरी ।राजकारणात कॉंग्रेस व शिवसेना एकत्र येतील अशी पुसटशीही कल्पना नसतांना महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांच्या विचाराच्या धर्तीवर वर राज्य कारभार चालू आहे. त्याच धर्तीवर सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये एक गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे की जिच्यावर राजे शिवाजी महाराजांच्या कार्य पद्धतीची छाप जाणवते. ज्यामुळे महाराष्ट्रात तरी धार्मिक एकोपा कायमचा राहू शकतो.आणि ती गोष्ट म्हणजे.अमरावतीत व जळगावात महानगरपालिकेच्या राजकारणात शिवसेना व एमआयएम ने एकमेकांवर दाखवलेला विश्वास.
यातून धार्मिक भेदाभेद मतमतांतरे विसरून समाज विकासाचा व माणूसकीचा धागा पकडून सर्वच राजकीय पक्षांनी महाराष्ट्रात असा पॅटर्न राबविला तर संपूर्ण देशाला योग्य दिशा देणारे महाराष्ट्र राज्य हे एक उत्तम उदाहरण ठरू शकते.उदाहरण छोट आहे पण समाज विकासाचे आहे. ह्याचे रूपांतर मोठ्यात झाले तर संपूर्ण विश्वाला भारत धार्मिक एकात्मतेचे उदाहरण ठरेल…..पि.के.महाजन.