महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२० मार्च । पिंपरी । राष्ट्रीय समाज पक्षाचे शहराध्यक्ष भरत महानवर यांनी काल दिनांक १९-०३-२०२१ रोजी अभियंता साहेब महावितरण विभाग पिंपरी पुणे कार्यालय येथे महादेवजी जानकर साहेब यांच्या आदेशानुसार वीज कनेक्शन तोडणी स्थगिती देणे बाबत निवेदन देण्यात आले, आधीच टाळेबंदी मुळे जनता आर्थिक अडचणींमध्ये आहे. बरेच व्यवसाय बंद झाले , लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, ऊर्जामंत्री यांनी आश्वासन दिलेल्या वीज बिल माफी चे काय झाले ? राज्य सरकारने वीज कनेक्शन तोडणीला स्थगिती द्यावी व लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व महावितरणच्या कुठल्याही कर्मचाऱ्याला वीज तोडणीसाठी फिरू दिले जाणार नाही असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे शहराध्यक्ष भरत महानवर यांनी दिला.
यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक शहर अध्यक्ष छत्रपती सागोलकर महिला शहराध्यक्ष रोहिनिताई गंगावणे , सरचिटणीस स्वातीताई सुखे , अल्पसंख्याक अध्यक्ष अरिफभाई शेख, वि.आ. शहराध्यक्ष उमेशभाऊ लोहार शहर उपाध्यक्ष माऊली मोटे, युवक उपाध्यक्ष अक्षय वायकुळे, व्यापारी आघाडी अध्यक्ष पप्पू वायसे, तसेच आंबादास तावडे अशोक ठोंबरे ,विद्यासागर सुके , खंडू सलगर असे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.