महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२० मार्च । पुणे ।कोथरूडमधील रामबाग कॉलनीतील सोसायटी आवारात सरस्वती चालवणाऱ्या एका महिलेला मारहाण केल्याच्या आरोपावरून भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या विरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
मनिषा संतोष भोसले यांनी तक्रार दिली आहे. गणेश पुजा सोसायटी बाहेर काही दिवसांपासून मनिषा भोसले उसाच्या रस विक्रीची गाडी लावत होत्या. सोसायटीतील रहिवासी जयंत कुलकर्णी यांचे मनीषा यांच्याशी वाद झाले होते, त्यानंतर महिलेने कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी दोघांना समज दिली. मात्र आज पुन्हा वाद झाले त्यामुळे मेधा कुलकर्णी यांनी त्या ठिकाणी जाऊन भोसले यांना कुलकर्णी यांची माफी मागायला सांगून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला.