सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २१ – पुणे – सोने आणि चांदीच्या दरात प्रत्येक दिवशी चढ-उतार होताना दिसत आहे.सोन्याच्या दरात गेल्या २ दिवसात घसरण झाली तरी सोनं विकत घेण्यासासाठी जवळपास 45 हजार रूपये मोजावे लागत आहेत. शुक्रवारी चांदीच्या दरात 135 रूपयांची घसरण झाली असून प्रति किलोग्राम चांदीचे दर 66 हजार 704 रूपयांवर पोहोचले. शुक्रवारी सोन्याचे दर वाढले असून जवळपास प्रति ग्रामसाठी 45 हजार रूपये मोजावे लागत आहे. पूर्वीपेक्षा सोन्याचे दर कमी झाल्यामुळे बाजारात सोन्यासाठी मागणी वाढली आहे.

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीप्रमाणे, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरांत सतत वाढ नोंदवण्यात येत होतीं. पण आज मात्र गेल्या २ दिवसात सोन्याच्या दरात घरसण झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्यासाठी हिच संधी आहे.

जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचे आजचे दर
शहर 22 कॅरेट 24 कॅरेट
मुंबई 44 हजार 240 45 हजार 60
पुणे 44 हजार 60 45 हजार 60
नवी दिल्ली 44 हजार 240 45 हजार 60
चेन्नई 42 हजार 480 46 हजार 340
केरळ 44 हजार 250 46 हजार 90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *