पेट्रोल-डिझेलची शंभरी, महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल कुठे?

Spread the love

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २१ – पुणे – गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. अनेक दिवस 95 ते 98 रुपयांच्या आसपास असलेलं पेट्रोलने आज शंभरी गाठली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक रेकॉर्ड ब्रेक झाले होते. (Petrol Diesel Price Today Update)

दररोज सकाळी 6 च्या दरम्यान तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले जातात. Goods Return या वेबसाईटने आज पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा परिणाम आवश्यक गोष्टींवर होतो. त्यामुळे सर्वसामान्यांचे लक्ष दररोज बदलणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर असते.

राज्यातील सर्वात महाग पेट्रोल कुठे?

महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल हे परभणीत पाहायला मिळत आहे. परभणीमध्ये पेट्रोलचा दराने शंभरी गाठली आहे. परभणीत पेट्रोलचा दर हा 100.06 रुपये इतका आहे. त्यापाठोपाठ नांदेडमध्ये 99.63 रुपये किंमतीने पेट्रोलची विक्री होत आहे. त्याशिवाय परभणीत डिझेलची विक्री सार्वाधिक दराने होत आहे. परभणी शहरात डिझेलचा दर 89.64 रुपये इतका आहे. (Petrol Diesel Price Today Update)

पुणे ₹ 97.70 ₹ 87.37
औरंगाबाद ₹ 97.87 ₹ 87.54
कोल्हापूर ₹ 97.69 ₹ 87.39
लातूर ₹ 98.67 ₹ 88.33
मुंबई शहर ₹ 97.57 ₹ 88.60
नागपूर ₹ 97.40 ₹ 87.11
रायगड ₹ 97.08 ₹ 86.75
रत्नागिरी ₹ 99.09 ₹ 88.71
सांगली ₹ 97.49 ₹ 87.20
सातारा ₹ 98.04 ₹ 87.73
सिंधुदुर्ग ₹ 98.94 ₹ 88.59
सोलापूर ₹ 97.61 ₹ 87.31
ठाणे ₹ 97.28 ₹ 86.94

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *