मंगल फौंडेशन व डॉ. पाईल्स क्लिनिकतर्फे सुश्रृत पुरस्कार प्रदान

Spread the love

Loading

आयुर्वेद संस्कृती विकसीत झाली पाहिजे
खासदार अमर साबळे यांचे मत :

महाराष्ट्र 24 – पुणे : आयुर्वेद ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. आयुर्वेदाच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा देशातल्या गरिबांपर्यंत पोचविणे शक्य होते. आयुर्वेद ही केवळ औषध उपचार पद्धती नाही तर देशाची संस्कृती असून आयुर्वेदाची ही संस्कृती भविष्यात अधिक विकसित झाली पाहिजे, असे मत खासदार अमर साबळे यांनी व्यक्त केले. 

डॉ. पाईल्स क्लिनिकतर्फे आयुर्वेद क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाºया वैद्यांना अमर साबळे यांच्या हस्ते सुश्रृत पुरस्कार प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. कोंढवा-कात्रज रस्त्यावरील इस्कॉन टेम्पल येथे पुरस्कार वितरण सोहळ््याचे आयोजन करण्यात आले होते. मंगल मेडिकल मेडिकल फाउंडेशनचे प्रमुख डॉ. कुणाल कामठे, मंगल कामठे, माजी आमदार योगेश टिळेकर डॉक्टर एस. के. मुरुड, अ‍ॅड. प्रताप परदेशी, डॉ. मिलिंद भोई आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. के. के. सिजोरिया (ग्वाल्हेर), डॉ. महेश संघवी (मुंबई), डॉ. नंदकिशोर बोरसे (पुणे), वैद्य अश्वीन बरोत (लंडन) यांना जीवन गौरव सुश्रुत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. रमेश घोडके (बीड), डॉ. हेमंत इंगळे (नांदेड), डॉ. राजेंद्र झोल (औरंगाबाद) यांना सुश्रुत रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर डॉ. आलोक गुप्ता (यवतमाळ), डॉ. भरत ओझा (पुणे) यांना एक्स्ट्रॉआॅर्डिनरी वर्क इन प्रोक्टोलॉजी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. सुर्यकिरण वाघ (कोल्हापूर), डॉ. वीणा देव (नागपूर), डॉ. हरीष पाटणकर (पुणे) यांना आयुर्वेद आयकॉन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अमर साबळे म्हणाले, सद्गुणांचा सत्कार करणे ही भारतीय संस्कृती आहे. आयुर्वेद हा भारतीय संस्कृतीचाच एक भाग आहे. या वैद्यकीय संस्कृतीच्या माध्यमातून अनेक व्यक्ती गरिबांना उपचार देत आहेत त्यांचा सत्कार करणे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. अ‍ॅलोपॅथी आणि आयुर्वेद वैद्यकीय शास्त्राच्या दोन विभागांमध्ये जेव्हा वैचारिक संघर्ष निर्माण झाला तेव्हा मी संसदेमध्ये आयुर्वेदाचे महत्त्व अधिक ठळकपणे मांडले आणि यापुढेही हा प्रयत्न करीत राहणार आहे.  


डॉ. कुणाल कामठे म्हणाले आयुर्वेदिक उपचार पद्धती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक प्रयत्न केला पाहिजे. हे काम आम्ही व्यवसाय म्हणून नव्हे तर सेवा म्हणून करीत असून भविष्यामध्ये मोबाईल आयुर्वेद दवाखान्याच्या माध्यमातून घराघरात आयुर्वेद पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *