मुबई पाठोपाठ पुण्यात होळी, धुलीवंदन, रंगपंचमी साजरी करण्यास मनाई, पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २४ – पुणे – गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच आता दिवसागणिक रुग्णांची संख्याही मोठी आहे. कोरोनाचा संसर्ग आणि प्रादुर्भाव पसरण्याची भीती लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात होळी सणावर बंदी घालण्यात आलीय. (Ban On Holi, Dhulivandan, Rangpanchami Celebrations Orders Of Pune District Collector)

होळी, धुलीवंदन, रंगपंचमी हे सण/उत्सव साजरे करण्यास मनाई
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रामध्ये साजरे होणारे होळी आणि धुलीवंदन सण/उत्सव एकत्रित येऊन सार्वजनिक ठिकाणी साजरे करण्यास मनाई आहे. तसेच हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक आणि खासगी मोकळ्या जागा, सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळ्या जागा येथे होळी, धुलीवंदन, रंगपंचमी साजरे करण्यास बंदी घालण्यात आलीय.

धुलीवंदन आणि रंगपंचमी सण/उत्सव साजरे करण्यास मनाई
कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून गर्दी टाळण्यासाठी पुणे जिल्ह्याचे ग्रामीण कार्यक्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणी होळी खेळण्यास मज्जाव करण्यात आलाय. तसेच हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक आणि खासगी मोकळ्या जागा, सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळ्या जागा येथे 28 मार्च 2021 ला साजरी होणारी होळी आणि 29 मार्चला साजरा होणारा धुलीवंदन आणि रंगपंचमी सण/उत्सव साजरे करण्यास मनाई केलीय. सदर मनाई आदेशांचं पालन करून नागरिकांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असंही जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणालेत. तसेच जे कोणी आदेशाचा भंग करतील त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *