महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २५ – पुणे – सलग ५ दिवस सोन्याच्या किंमतीत (today Gold Rate) घट झाल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण होतं. पण काल सोन्याच्या दरात १००० ची वाढ झाली तर चांदी ७०० रु. प्रति किलो घट पहायला मिळाली. आज तर सोन्याचा दर कालच्यापेक्षाही जास्त पाहायला मिळतोय. त्यामुळे सोने खरेदी करण्यासाठी साधारण ४५००० रु तोळा मोजावे लागत आहे .
गुड रिटर्न वेबसाईटनुसार २२ कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत काल ४४,०२० रुपये होती. आज ही किंमत वाढून होऊन ४४,०३० इतकी झाली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची कालची किंमत ४५,०२० रुपये इतकी होती. आज यामध्ये 10 रुपयांनी वाढ झालीय. आज हा दर ४५०३० वर येऊन पोहोचलाय.
चांदीच्या दरातही (Today Silver Rate) वाढ नोंदवण्यात आलीय. काल एक किलो चांदीचा दर ६५३०० इतका होता. आज यामध्ये ४०० रुपयांची वाढ नोंदवण्यात आलीय. हा दर आता ६५७०० इतका झाला आहे.