महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २५ – मुंबई – वोडाफोन आयडिया (Vodafone Idea) कंपनीने देशभरात त्यांच्या दोन फॅमिली पोस्ट पेड फॅमिली प्लॅन्सची किंमत वाढवली आहे. 598 रुपयांच्या Vi फॅमिली पोस्टपेड प्लॅनची किंमत 649 रुपये इतकी झाली आहे. तर 749 रुपयांच्या प्लॅनची किंमत 799 रुपये इतकी वाढवण्यात आली आहे. (Voda-Idea customers have to pay Rs 649 instead for 598 rs plan)
Vi टेलिकॉम टॉकने दिलेल्या वृत्तानुसार, कंपनी 649 रुपये आणि 799 रुपयांच्या प्लॅनव्यतिरिक्त 999 रुपये, 948 आणि 1,348 रुपयांचे पोस्टपेड प्लॅनदेखील ऑफर करते. हे सर्व Vi फॅमिली पोस्टपेड प्लॅन अमेझॉन प्राइम, ZEE5, Vi मुव्हिज अँड टीव्ही आणि मोबाइल प्रोटेक्शन इन्श्योरन्ससाठी वार्षिक सब्सक्रिप्शनसह 200GB डेटा रोलओव्ह बेनेफिट देतात. तसेच अनलिमिटेड कॉल आणि दर महिना 100 एसएमएसचाही यात समावेश आहे.
टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार 649 रुपयांच्या Vi फॅमिली पोस्टपेड मंथली प्लॅनची किंमत पूर्वी 598 रुपये इतकी होती. यात प्रायमरी आणि अॅड-ऑन कनेक्शन सहित दोन कनेक्शन मिळतात. यात कंपनीने एकूण 80GB डेटा ऑफर केला आहे. यात 50GB प्रायमरी कनेक्शनसाठी आणि 30GB डेटा मीडियम कनेक्शनसाठी दिला आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि एकूण 100 मोफत एसएमएसची सुविधा देण्यात आली आहे.
Vi च्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, कंपनी 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत अनेक अनलिमिटेड, कॉम्बो / वैधता (Combo/validity) आणि डेटा प्लॅन्स ऑफर करते, जे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. चला तर मग Vi च्या शानदार प्लॅन्सबाबतची माहिती जाणून घेऊया.
यामधील पहिला प्लॅन 39 रुपयांचा आहे, या प्लॅनची वैधता 14 दिवसांची असून यामध्ये 100MB डेटा आणि 30 रुपये मिळतील. या यादीत 59 रुपयांचा दुसरा प्लॅन आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवस असून यामध्ये 30 लोकल + नॅशनल + रोमिंग कॉलिंग मिनिट्स मिळतील. 28 दिवसांच्या वैधतेसह कंपनीने 64 रुपयांचा प्लॅन सादर केला आहे. यामध्ये 52 रुपये आणि 100 एमबी डेटा मिळेल.
कंपनीने 28 दिवसांच्या वैधतेसह 79 रुपयांचा प्लॅन सादर केला आहे. यामध्ये ग्राहकांना 64 रुपये आणि 400MB डेटा मिळेल. सोबतच 28 दिवसांच्या वैधतेसह 49 रुपयांचा प्लॅन कंपनीने सादर केला आहे. त्यामध्ये ग्राहकांना 38 रुपये आणि 300MB डेटा दिला जात आहे. तसेच 56 दिवसांच्या वैधतेसह 74 रुपयांचा प्लॅन कंपनीने सादर केला आहे. यामध्ये ग्राहकांना 74 रुपये आणि 200MB डेटा मिळेल.
डेटा प्लॅन्स
जर तुम्ही डेटा प्लॅन्स शोधत असाल तर कंपनीने तुमच्यासाठी 28 दिवसांच्या वैधतेसह 48 रुपयांचा प्लॅन सादर केला आहे. ज्यामध्ये ग्राहकांना 3GB डेटा दिला जात आहे. तर 16 रुपयांमध्ये 1GB डेटा दिला जात आहे. तसेच 28 दिवसांच्या वैधतेसह कंपनीने 98 रुपयांचा प्लॅन सादर केला आहे, ज्यामध्ये ग्राहकांना 12GB डेटा मिळेल. यासह तुम्हाला एसएमएस, आयएसडी पॅक, एंटरटेन्मेंट पॅक इत्यादींसह इतरही अनेक प्रकारच्या योजना मिळतील ज्यांची किंमत 100 रुपयांपेक्षा कमी आहे.