महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २५ – डेहराडून – उत्तराखंड हायकोर्टाने हरिद्वार कुंभमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी १ एप्रिलपासून कोविड-१९ चा निगेटिव्ह आरटी-पीसीआर रिपोर्ट आणणे सक्तीचे केले आहे. बुधवारी मुख्य सचिव ओमप्रकाश म्हणाले, भाविकांना लसीकरणाचेही प्रमाणपत्र दाखवता येईल. हॉटेल्स, धर्मशाळा वा गेस्ट हाऊसमध्ये मुक्कामासाठी हा रिपोर्ट दाखवावा लागेल.
१ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी भाविकांना कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट दाखवण्याची गरज नाही अशी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री तीरथ सिंह यांनी केली होती. या नंतर हायकोर्टात अनेक जनहित याचिका दाखल झाल्या होत्या. त्यावर सुनावणी करताना बुधवारी हायकोर्टाने हा निकाल दिला. दरम्यान, सोमवारी तीरथ सिंह रावत यांनाही कोरोना संसर्गाचे निदान करण्यात आले.