पुण्यातील लॉकडाउनबाबत अजित पवारांचे मोठे वक्तव्य

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २६ – मुंबई – देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून महाराष्ट्र यामध्ये आघाडीवर आहे. देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे एकट्या महाराष्ट्रात आहेत. पुण्याचाही यामध्ये समावेश आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने अनेक शहरांनी लॉकडाउनचा पर्याय निवडला आहे. दरम्यान पुण्यातील स्थितीसंबंधी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना दिली असून त्यांनी लॉकडाउनसंदर्भातही भाष्य केले आहे.

कोरोनाचे संकट मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे. मुख्यमंत्र्यांसहित सर्वजण आपल्याला आवाहन करत आहेत. काही शहरांमध्ये प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी पुण्यात पालकमंत्री नात्याने लोकप्रतिनिधींना बोलवले असून अधिकाऱ्यांसोबत दर शुक्रवारी बैठक होत असते. आम्ही या बैठकीत निर्णय घेतो. लॉकडाउनसंबंधी मतांतर आहे, पण नियमांचे पालन केले पाहिजे यावर एकमत असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.

त्यामुळे यामध्ये पक्षीय राजकारण न आणता हे आपल्या सर्वांवरचे संकट आहे, या भावनेने आपण कोरोनाशी लढले पाहिजे. ४५ वर्षापुढील सर्वांचे लसीकरण करण्याची मागणी आम्ही केली होती, ती मान्य झाली त्याबद्दल केंद्र सरकारचे आभार. पण आता ४५ च्या आतील अनेकांना कोरोना होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *