दुसरी वनडे ; इंग्लंडला २ मोठे झटके ; भारताकडून हा फलंदाज करू शकतो पदार्पण

Spread the love

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २६ – पुणे – भारत विरुद्ध खेळल्या जाणार्‍या दुसर्‍या वनडे सामन्यापूर्वी इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. पहिल्या वनडे सामन्यात दुखापतग्रस्त झालेला कर्णधार इऑन मॉर्गन या मालिकेतून बाहेर आला आहे. या मालिकेचा दुसरा सामना शुक्रवारी रंगणार आहे. आता विकेटकीपर जोस बटलर उर्वरित सामन्यांमध्ये कर्णधार असणार आहे.

मालिकेच्या पहिल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना इंग्लंड संघाचा कर्णधार मॉर्गनच्या हाताला दुखापत झाली. त्याच्या उजव्या हाताच्या अंगठा व बोटाला गंभीर दुखापत झाली. ज्यामुळे हाताला ४ टाके लागले. सामना संपल्यानंतर मॉर्गनने म्हटले होते की, याक्षणी तो काही बोलू शकत नाही परंतु किमान 24 तास थांबू इच्छितो. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने कर्णधाराला झालेल्या दुखापतीविषयी माहिती देताना तो या सीरीजमधून बाहेर झाला आहे.

इयन मॉर्गनबरोबर फलंदाज सॅम बिलिंग्सही पहिल्या सामन्यादरम्यान जखमी झाला होता. बिलिंग्जची दुखापतही खूप गंभीर आहे आणि मालिकेच्या उर्वरित दोन सामन्यांमधूनही तो बाहेर झाला आहे. हे दोन्ही खेळाडू इंडियन प्रीमियर लीगच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळणार का याबाबत ही संशय आहे.

श्रेयस अय्यरच्या ( Shreyas Iyer) खांद्याची दुखापत गंभीर असल्यानं त्याला मालिकेतूनच माघार घ्यावी लागली आणि आयपीएल ( IPL 2021) मध्येही तो दिल्ली कॅपिटल्सचे ( Delhi Capitals) नेतृत्व करू शकणार नाही. त्यामुळे त्याच्या जागी उद्याच्या सामन्यात आणखी सूर्यकुमार यादव पदार्पण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय संघ दुसऱ्या वन डे सामन्यात एका बदलासह मैदानावर उतरून विजयी लय कायम राखण्याचा प्रयत्न करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *