शेतकरी संघटनांकडून आज भारत बंदची हाक

Spread the love

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २६ – नवीदिल्ली – केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे (New Farm laws) रद्द करावेत, या मागणीसाठी दिल्लीत पंजाब, हरियाणा, राजस्थानसह देशातील अनेक राज्यांतील शेतकरी आंदोलन (Farmers Protest) करत आहेत. आंदोलनकांचे म्हणणे केंद्र सरकार ऐकून घेत नाही. त्यामुळे आज शेतकरी संघटनांकडून भारत बंदची (Bharat Bandh ) हाक देण्यात आली आहे, असे किसान मोर्चाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, या बंदला राष्ट्रवादीने (NCP) जाहीर पाठिंबा दिला आहे.(‘Bharat Bandh’ call by Samyukt Kisan Morcha against Centre’s Farm Laws)

शेतकरी संघटनांच्या भारत बंदने वाहतूक आणि बाजारपेठांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज सकाळी 6 ते संध्या. 6 वाजेपर्यंत बंदची हाक शेतकरी संघटनांनी दिली आहे. कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांकडून बंदची हाक देण्यात आली आहे. कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवरील आंदोलक शेतकरी संघटनांकडून भारत बंद पुकारण्यात आला आहे. कोणालाही भारत बंदमध्ये भाग घेण्यास भाग पाडले जाणार नाही, असे म्हटले असले तरी या बंदला संपूर्ण यशस्वी करण्याचे आवाहन शेतक्यांनी देशातील नागरिकांना केले आहे.

आंदोलनाला 120 दिवस पूर्ण झाल्याबद्दल बंद पुकारण्यात आल्याचे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे. विविध कामगार संघटना, विद्यार्थी संघटनांनी बंदला पाठींबा जाहीर केला आहे. या बंदचा परिणाम रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर होण्याची शक्यता आहे. त्यासोबत काही भागातील बाजारपेठाही बंद राहण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणूक आसलेली चार राज्ये आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात बंद पाळण्यात येणार नाही.

दरम्यान, अमृतसरच्या वल्ला रेल्वे गेटवर दिल्ली रेल्वे मार्गावर धरणे धरण्यात आले आहे. येथे पोलिसांनी पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे आणि अतिरिक्त पोलिस बंदोबस्तही लावण्यात आला आहे. शेतकरी नेते म्हणाले की, आज शेतकरी कृषी कायद्याच्या (New Agriculture Laws) विरोधात आहेत. शेतकरी संघटनांकडून भारत बंदच्या आवाहनाचा भाग म्हणून रेल्वे आणि रस्ते मार्गावर धरणे करण्यात येईल. अमृतसरमध्ये अमृतसर दिल्ली रेल्वे मार्गावर वल्ला गेटजवळ धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *