महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २७ मार्च – मुंबई – भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli)एकदिवसीय सामन्यात चांगली धावसंख्या नोंदवतोय. पण अलीकडच्या काळात तो या डावांना सेंच्युरीमध्ये बदलू शकलेला नाही. माजी फलंदाज सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar)एकदिवसीय सामन्यातील 49 शतकांपासून कोहली 6 शतकं दूर आहे. कोहलीने आतापर्यंत 43 शतके केली आहेत. त्याने याआधीचं शतक वेस्ट इंडिजविरुद्ध त्रिनिदादमध्ये 14 ऑगस्ट 2019 रोजी नाबाद 114 धावा करुन नोंदवलं. त्यानंतर आतापर्यंत त्याने एकदिवसीय सामन्यात शतक ठोकलेले नाही.
मात्र कोहलीची (Virat Kohli) सरासरी 45.85 आहे. या काळात त्याने 14 डावात 8 अर्धशतके झळकावली आहेत. तो अनेक वेळा शतकाच्या जवळ पोहोचला पण शतकासाठी हुकला.
इंग्लंडविरुद्धच्या दुसर्या सामन्यात कोहलीने 66 धावा केल्या आणि वनडेमध्ये सलग चार अर्धशतके पूर्ण केली. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात त्याने 56 धावा केल्या. यापूर्वी ऑस्ट्रेलिया दौर्यावर त्याने 89 आणि 63 धावा केल्या होत्या.