सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर हीच योग्य वेळ ; होळीनंतर दर 48 हजारांची गाठणार ? सराफा व्यावसायिकांकडून अंदाज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २७ मार्च – मुंबई – गेल्या काही दिवसांपासून खालच्या बाजूला प्रवास करत असलेल्या सोन्याचे दर (Gold rates) पुन्हा एकदा उसळी घेण्याचे संकेत मिळत आहेत. होळीनंतर वायदा बाजार आणि स्थानिक बाजारपेठांमध्ये सोन्याचे दर पुन्हा वाढायला सुरुवात होती. सध्या सोन्याचा दर प्रतितोळा 44000 च्या आसपास आहे. मात्र, आगामी दोन महिन्यात सोन्याचे दर पुन्हा एकदा 48 हजारांची पातळी गाठतील, असा अंदाज सराफा व्यावसायिकांकडून व्यक्त केला जात आहे. (Gold and Silver Today’s price in Mumbai)

अलीकडच्या काळात सोन्याच्या दरात किंचित का होईना पण सातत्याने घसरण दिसून आली होती. गेल्या महिनाभराच्या काळात सोनं प्रतितोळा जवळपास 1800 रुपयांनी स्वस्त झालं होतं. हा ट्रेंड आणखी काही दिवस कायम राहील. मात्र, त्यानंतर सोन्याच्या किंमतीचा प्रवास पुन्हा वरच्या दिशेने सुरु होऊ शकतो. त्यामुळे गुंतवणुकदारांनी सोने खरेदीसाठी होळीचा मुहूर्त साधावा, असे जाणकारांकडून सांगितले जात आहे.

शनिवारी 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 44,000 रुपये इतकी नोंदवण्यात आली. शनिवारी सोन्याच्या किंमतीत (आज सोन्याच्या किंमतीत) प्रति दहा ग्रॅम 160 रुपयांची घसरण दिसून आली. या घसरणीनंतर सोन्याचे दर (22 कॅरेटचे 10 ग्रॅम) 43,920 रुपयांवरुन 43,760 रुपयांवर गेले. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 44,920 रुपयांवरुन 44,760 रुपयांवर आली आहे. गेल्या सहा महिन्यांत सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 10,000 रुपयांनी घट झाली आहे.

गुड रिटर्न्स या संकेतस्थळाच्या माहितीनुसार, दिल्लीत 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 43,850 रुपयांवर गेली आहे. चेन्नईमध्ये हा दर 42160 इतका आहे. तर मुंबईत प्रतितोळा सोन्यासाठी 43,760 रुपये मोजावे लागत आहेत.

सोनं 56000 पर्यंत जाण्याची शक्यता
पब्लिकन आणि डेमोक्रॅट्सने अमेरिकेतील कोरोना साथीच्या आजारांना सामोरे जाण्यासाठी 900 अब्ज डॉलर्सच्या प्रोत्साहन पॅकेजवर सहमती दर्शवली. त्यामुळे सोन्याची किंमत (Gold Price) आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढली होती. या तेजीमुळे स्थानिक बाजारात सोन्याचे दर 56,000 च्या उच्च स्तरावर जाऊ शकतात, असा अंदाज जाणकारांकडून वर्तविण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *