कोरोनाला थोपवण्यासाठी फडणवीसांचा राज्य सरकारला सल्ला ; ‘या’ त्रिसूत्रीचा अवलंब करण्यात यावा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २७ मार्च – मुंबई – कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू केला जातोय की काय अशी शंका व्यक्त केली जातेय. मात्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लॉकडाऊनला विरोध करत कोरोना चाचण्या वाढवण्याची गरज व्यक्त केली आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी त्यांनी एक फॉर्म्यूला सांगितला आहे. फडणवीसांनी ट्विट करत ‘टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट’ ही त्रिसूत्रीच कोरोनाला थोपवू शकते असं म्हटलंय. तसेच, चाचण्या वाढवणे हाच कोरोना रोखण्याचा उत्तम मार्ग आहे. हे वारंवार सांगूनही न ऐकणार्‍या मविआ शासनाला अखेर सुबुद्धी झाली. दैनंदिन चाचण्या 1 लाखांवर जाण्यासाठी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची वाट महाराष्ट्राला पहावी लागली,” असा टोलाही त्यांनी लगावला. (Devendra Fadnavis opposes lockdown advised Testing Tracing and Treatment of corona patient)

आता तरी हे सूत्र कायम ठेवा
“राज्यात लॉकडाऊन नाही तर ‘टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट’ हाच कोरोना रोखण्याचा प्रभावी उपाय आहे. 10 दिवसांत सरासरी 1,26,950 चाचण्या दररोज होत आहेत. दैनंदिन चाचण्या 1 लाखांवर जाण्यासाठी महाराष्ट्राला कोरोनाच्या दुसरऱ्या लाटेची वाट पहावी लागली. येणार्‍या काळात चाचण्यांची संख्या आणखी वाढवायला हवी. राज्याची पूर्ण क्षमता वापरली गेली पाहिजे. आता तरी हे सूत्र कायम ठेवा,” असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

राज्यात उद्या पासून रात्रीची जमावबंदी
राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे गरजेचे असल्याचे राज्य सरकारने म्हटले. त्यामुळे कोरोना प्रतिबंधासाठी प्रभावी अंमलबजावणी म्हणून संपूर्ण राज्यात रविवारी (28 मार्च) रात्रीपासून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या शुक्रवारी (26 मार्च) दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *