महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – दि. २९ – मुंबई – विशेष प्रतिनिधी – कोरोना संकटात उद्भवलेल्या आर्थिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर जगभरातील लोक सोन्याच्या गुंतवणूकीवर जास्त अवलंबून होते. परिणामी गुंतवणूकदारांनी सोन्याची प्रचंड खरेदी केल्यामुळे ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याच्या किमती (Gold Rate Today)विक्रमी पातळीवर पोहोचल्या. २०२० मध्ये सोन्याच्या गुंतवणुकीत गुंतवणूकदारांना मोठा नफा दिला. दिल्ली सराफा बाजारात ऑगस्ट २०२० सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ५७००८ रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले होते. त्याचबरोबर चांदीचे दरही (Silver Rate Today) त्यावेळी उच्च स्तरावर पोहोचले होते. यानंतर कोरोना लसीची चांगली बातमी येताच लोक गुंतवणुकीच्या इतर पर्यायांकडे जाऊ लागल्याने सोने आणि चांदीची किमती कमी होऊ लागल्या. (Gold Rate Today Gold Price Falls 29 March 2021 By Rs 12,927 In 8 Months, Huge Return On Investment)
मौल्यवान पिवळ्या धातूची किंमत ऑगस्ट २०२० पासून आतापर्यंत १३००० रुपयांनी घसरून आज २९ मार्च २०२१ ला ४३९८० रुपये प्रति १० ग्रॅम झाली. त्याचबरोबर ऑगस्ट २०२० रोजी चांदी ७७८४० रुपये प्रतिकिलो होती, जी आज ऑगस्ट २०२० पासून आतापर्यंत १२००० रुपयांनी घसरून ६५७०० रुपयांवर गेली आहे . दरम्यान, दररोज सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये सतत वाढ होत असल्याने गुंतवणूकदारांनी सोन्यात गुंतवणूक करावी की अन्य पर्यायांकडे वळावे, असा प्रश्न त्यांना सतावतोय. त्याच वेळी काही गुंतवणूकदार आपल्याकडे असलेले सोने विक्री किंवा ठेवण्याबद्दल संभ्रमित आहेत. येत्या काळात सोन्यामध्ये कोणता ट्रेंड असू शकतो आणि जर तुम्ही आता गुंतवणूक केली तर त्यातून नफा होईल हेसुद्धा कळणार आहे.