महाराष्ट्र 24 । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पिंपरी चिंचवड । दि. ३० मार्च । गुंतवणूक (gold Investment) म्हणून सोनं हा उत्तम पर्याय आहे. सध्या सोन्याच्या दरात सातत्याने घट होताना दिसत आहे. सोन्याच्या दरात मागील ६ दिवसापासून घट दिसत आहे. सोमवारी २२ कॅरेट सोन्याचा दर ४२९८० रुपये प्रति १० ग्रॅम होता तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४३९८० रुपये प्रति १० ग्रॅम होता , त्यामुळे अशा स्थितीत तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार नक्की करू शकता.
गुड रिटर्न वेबसाईट नुसार आज सोन्याचा भाव २२ कॅरेट सोन्याचा दर ४२,९७० रुपये प्रति १० ग्रॅम होता तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४३,९७० रुपये प्रति १० ग्रॅम आहे . तर चांदी च्या भावात १५०० ची घट होऊन प्रति किलो ६४,२०० /रु. प्रति किलो आहे .
तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, सोन्याच्या किमती लवकरच वाढू शकतात.हे. तर येत्या 2 महिन्यात चांदीचे दर 70,000 ते 72,000 रुपयांदरम्यान असतील. अन्य अभ्यासकांच्या मते सोन्याच्या दरात मोठी तेजी येण्याची शक्यता असून हे दर 45,000 रुपयांवरुन 48,000 रुपयांवर पोहोचतील.