महाराष्ट्र 24 । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पिंपरी चिंचवड । दि. ३० मार्च । Petrol-Diesel price today:पेट्रोलियम कंपन्यांनी मोठा दिलासा दिला आहे. आज पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी होळीच्या दुसर्या दिवशी मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करण्याची घोषणा केली आहे. 30 मार्च 2021 रोजी पेट्रोलच्या किंमतीत 22 पैसे आणि डिझेलच्या किंमतीत 23 पैसे कपात करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या कपातीनंतर दिल्लीत पेट्रोलची किंमत 90.56 रुपये आहे तर डिझेलची किंमत प्रति लिटर 80.87 रुपये आहे. त्याचबरोबर मुंबईतील पेट्रोलची किंमत 96.98 रुपये आणि डिझेलची किंमत प्रतिलिटर 87.96 रुपये झाली आहे.
देशातील प्रमुख शहरातील दर
दिल्लीमध्ये (Delhi) पेट्रोल 90.56 रुपये आणि डिझेल 80.87 रुपये प्रति लीटर आहे.
मुंबईमध्ये (Mumbai) पेट्रोल 96.98 रुपये आणि डिझेल 87.96 रुपये प्रति लीटर झाले आहे.
कोलकातामध्ये (Kolkata) पेट्रोल 90.77 रुपये आणि डिझेल 83.75 रुपये प्रति लीटर आहे.
चेन्नईमध्ये (Chennai) पेट्रोल 92.58 रुपये आणि डिझेल 85.88 रुपये प्रति लीटर झाले आहे.