महाराष्ट्र 24 । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि. १ एप्रिल । सोने चांदी गुंतवणूक (gold Investment) म्हणून उत्तम पर्याय आहे. सध्या सोन्याच्या दरात सातत्याने चढ उतार होताना दिसत आहे. चांदीच्या दरात मागील मागील ३० दिवसात चढ उतार दिसत आहे. सोने जवळपास ४५००० हजार च्या आसपास १० ग्रॅम साठी भाव आहे तर चांदी दर हे १ किलो साठी ६५००० हजार मोजावे लागत आहेत . बुधवारी २२ कॅरेट सोन्याचा दर ४३३७० रुपये प्रति १० ग्रॅम होता तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४४३७० रुपये प्रति १० ग्रॅम होता , त्यामुळे अशा स्थितीत तुम्ही सोन्या , चांदी मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार नक्की करू शकता.
गुड रिटर्न वेबसाईट नुसार आज सोन्याचा भाव २२ कॅरेट सोन्याचा दर ४३,३६० रुपये प्रति १० ग्रॅम होता तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४४३६० रुपये प्रति १० ग्रॅम आहे . तर चांदी च्या भावात ४०० ची घट होऊन प्रति किलो ६३,६०० / रु. प्रति किलो आहे .
तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, सोन्याच्या किमती लवकरच वाढू शकतात.हे. तर येत्या २ महिन्यात चांदीचे दर ७०००० ते ७२००० रुपयांदरम्यान असतील. अन्य अभ्यासकांच्या मते सोन्याच्या दरात मोठी तेजी येण्याची शक्यता असून हे दर ४५००० रुपयांवरुन ४८००० रुपयांवर पोहोचतील.