महाराष्ट्र 24 । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । नवीदिल्ली । दि. १ एप्रिल । एक एप्रिलपासून लागू होणारी नवी वेतन संहिता लांबणीवर पडली आहे. यामुळे भारतीय कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. १ एप्रिल २०२१ पासून कर्मचाऱ्यांच्या पगार अाराखड्यात बदल होणार नाही. यामुळे आता टेक होम सॅलरी कमी होणार नाही. कामगार मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, नव्या कामगार कायद्यांबाबत राज्यांनी नियमांना अंतिम रूप दिलेले नाही. यामुळे केंद्राने वेतन संहितेचा निर्णय लांबणीवर टाकला आहे. यामुळे कंपन्यांना आराखड्यात बदलासाठी आणखी वेळ मिळेल.
नवी वेतन संहिता लागू झाल्यानंतर पगारदारांच्या सॅलरी स्ट्रक्चरमध्ये मोठा बदल झाला असता. यामुळे हाती पडणारा पगार कमी झाला असता. तसेच पगारातील मोठा हिस्सा पीएफ खात्यात जमा झाला असता. या नियमानुसार, वेतनात बेसिक सॅलरीचा पार्ट ५० टक्के असणे आवश्यक आहे. पीएफपोटी जास्त रक्कम द्यावी लागू नये म्हणून कंपन्या तो पार्ट कमीच ठेवत असतात.