महाराष्ट्र 24 । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि. १ एप्रिल । एक एप्रिलपासून देशात ४५ वर्षांवरील सर्व लोक कोरोना लसीचे डोस घेऊ शकतील. आतापर्यंत आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्कर्स, ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेले आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाच लस दिली जात होती. आता या लसीकरण अभियानात सहभागी लोकसंख्या ही कामासाठी बाहेर पडणारी आहे. त्यांना घरात राहणे शक्यच नाही. म्हणूनच १ एप्रिलनंतर भारत जगातील सर्वाधिक लसीकरण करणारा देश ठरेल, असे सरकारला वाटते. सध्या रोज दिलेल्या डोसची सरासरी २१ लाख आहे. ही संख्या ५० लाखांवर जाऊ शकते. आरोग्य मंत्रालयानुसार, देशात ५० हजार केंद्रांवर एक दिवसात १०० ते २०० डोस देण्याची व्यवस्था आहे. हे लसीकरण वेगाने व्हावे म्हणून खासगी रुग्णालयांना सहभागी करून घ्या, असे राज्यांना सूचित करण्यात आले आहे. दिल्ली, हरियाणा, चंदीगडमध्ये ४०% हून अधिक डोस खासगी रुग्णालयांत दिले जात आहेत.
लस न घेणारे लोक आपले कुटुंबीय, समाजासाठी कायम धोकादायक ठरतील
cowin.gov.in वर नोंदणी करा. लसीकरण केंद्राचा पर्याय निवडा. ऑनलाइन नोंदणी करू शकत नसाल तर केंद्रावर जा. नोंदणी करा.
-लसीकरण केंद्रावर आरोग्यविषयक कागदपत्रे दाखवावी लागत नाही.
– ओळखपत्र कोणतेही फोटो आयडी कार्ड. उदा. आधार, पॅन, मतदान ओळखपत्र.
– डोसनंतर विश्रांतीची गरज नाही. परंतु, लस घेतल्यावर रात्री किंवा दुसऱ्या दिवशी ताप आलाच तर तापावर गुणकारी औषधे घेऊ शकता.
-लसीचे साइड इफेक्ट , दंडावर सूज येऊ शकते. तापही येऊ शकतो. हे सामान्य परिणाम आहेत.
-खाण्यापिण्याचे पथ्य ,फक्त एकच लक्षात ठेवा, लस घेताना पोट रिकामे नसले पाहिजे.
-लस घेतल्यावर नियमित दिनचर्येत बदल करू नका. मधुमेह, रक्तदाब किंवा हृदयाशी संबंधित औषधे चालू असतील तर ती घेणे चालू ठेवा.
-कोणत्या केंद्रावर कोणती लस आहे हे तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला हवी ती लस असलेले केंद्र निवडू शकता. दाेन्ही लसी चांगल्या आहेत.
-लस घेतल्यानंतर मास्क आणि सुरक्षित अंतर पाळणे गरजेचे आहे. जोवर सरकार देश कोरोनामुक्त घोषित करत नाही तोवर…
-कोरोना झालेल्यांनीही लसीचा डोस घ्यायला हवा डोसमुळे शरीरात अँटिबॉडी प्रोटीन वाढतात. दुसरा फायदा म्हणजे लस घेतल्यावर संसर्ग झाला तरी गंभीर
आजारी पडण्याची शक्यता बऱ्याच अंशी कमी होऊन जाते.
(भारत सरकारच्या कोविड-१९ ग्रुपचे चेअरमन डॉ. नरेंद्र अरोरा यांनी दिलेली ही माहिती .)