महाराष्ट्र 24 । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि. १ एप्रिल । कोरोनाग्रस्तांमध्ये युवकांचे प्रमाण वेगाने वाढत असल्याची माहिती ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अर्थात एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी गुरुवारी एका खाजगी दूरचित्रवाहिनीशी बोलताना दिली. देशात कोरोनाचे संक्रमण वेगाने फैलावत असून मागील चोवीस तासात ७२ हजारपेक्षा जास्त रुग्ण वाढले आहेत.
कोरोनाचा संसर्ग वाढलेला असतानादेखील तरुण मुले बाहेर फिरत आहेत व गर्दीत मिसळत आहेत. हलका कोरोना येईल व जाईल, अशी त्यांना वाटते. तथापि याच तरूण मुलांमुळे त्यांच्या घरातील प्रौढ व वृद्ध लोकांना जीव धोक्यात येत आहे, असा इशारा डॉ. गुलेरिया यांनी दिला. ४५ वर्षावरील लोकांनी याचमुळे लवकरात लवकर कोरोनावरील लस घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.