महाराष्ट्र 24 । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि. २ एप्रिल । बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड (Ban vs NZ) यांच्यातील तिसऱ्या टी ट्वेन्टी सामन्यात न्यूझीलंडचा विकेट कीपर डेवॉन कॉनवेने शानदार स्टम्पिंग करत धोनीच्या स्टम्पिंगची आठवण करुन दिली. बांगलादेशच्या डावाची सहावी ओव्हर सुरु असताना आफिफ हुसेन मोठा फटका खेळण्याच्या नादात क्रिज सोडण्याच्या प्रयत्नात होता. आफिफचा इरादा कॉनवेने ओळखला. त्याला कॉनवेने पुढे जाऊ दिलं. आणि डोळ्याची पापणी लवायच्या आत त्याने आफिफला स्टम्पिंग केलं. मैदानी अंपायरने हा निर्णय साहजिक थर्ड अंपायरकडे दिला. सगळ्या अँगलन्सनी पाहिल्यानंतर थर्ड अंपायरने बॅट्समनला आऊट घोषित केलं.
भारतीय संघाचा माजी कर्णधार कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) डोळ्याच्या पापण्या लवायच्या आत तो स्टम्प उडवतो. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला तंबूत जावं लागतं. धोनीच्या याच चलाखपणाचा प्रत्यय अनेक मॅचेसमध्ये आलाय. धोनीच्या स्टम्पिंगने अनेक मॅच फिरल्या आहेत. अशीच धोनीसारखी किंबहुना धोनीच्या स्टम्पिंगची आठवण करुन देणारी स्टम्पिंग न्यूझीलंडचा विकेट कीपर डेवॉन कॉनवे (Devon Convey Stumping) याने केली आहे. त्याच्या चलाखीने बांगलादेशच्या आरिफ हुसेनला तंबूत जावं लागलं. (New zealand Devon Convey Stumping bangaladesh Afif hossain video)
Brilliant work behind the stumps by Devon Conway 🙌#NZvBAN | https://t.co/m2JoVQFNLFpic.twitter.com/iXbhBaTV0l
— ICC (@ICC) April 1, 2021