Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
पुणेकरांसाठी चांगली बातमी ! ऐन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 'म्हाडा'कडून घरांची सोडत - Maharashtra 24

पुणेकरांसाठी चांगली बातमी ! ऐन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘म्हाडा’कडून घरांची सोडत

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि. २ एप्रिल । पुणे हाऊसिंग मंडळाच्या (Pune MHADA) वतीने ऐन गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तब्बल 2 हजार घरांची सोडत काढण्यात येणार आहे. लवकरच त्याची रितसर जाहिरात प्रसिद्ध होणार असून पुणे म्हाडाचे सीईओ नितीन माने पाटील यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे. पुणे म्हाडाने गेल्या वर्षी म्हणजेच जानेवारी 2020 मध्ये तब्बल 5 हजार 657 घरांची सोडत काढून मोठा दिलासा दिला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार (AJit Pawar) यांच्या हस्ते नुकतीच त्याची सोडतही काढण्यात आली होती. त्यापाठोपाठ आणखी 2 हजार घरांची जाहिरात पुणे म्हाडा लवकरच प्रसिद्ध करत आहे.

पुणे विभागातील पुणे शहर पिंपरी-चिंचवड सांगली, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात मिळून तब्बल 2 हजार घरांची ही जाहिरात असणार आहे. यामध्ये म्हाडाच्या गृहप्रकल्पातील 600 सदनिका तर इतर घरेही बिल्डरकडील 20 टक्के कोट्यातील असतील. यापैकी एकट्या पुणे शहरात दीड हजार घरे ही पुणे शहरातील नामांकित बिल्डरांनी बांधलेल्या स्किममधील असणार आहेत. सर्वसामान्य नागरिकांना अगदी परवडणाऱ्या दरामध्ये ही घरे उपलब्ध होणार आहेत. पुणे म्हाडाचे सीईओ नितीन माने-पाटील यांनी ही माहिती दिली आहे.पुणे म्हाडाच्या इतिहासात प्रथमच पाडव्याला इतक्या मोठ्या संख्येनं घरांची सोडत जाहीर होणार आहे. कोरोना काळात सर्वसामान्य नागरिकांना हक्काचं घर मिळण्याबाबतीत थोडासा दिलासा देण्याचा म्हाडाचा हा एक प्रयत्न असल्याचं म्हाडाचे सीईओ नितीन माने पाटील यांनी म्हटलं आहे.

कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक परिस्थिती खूपच बिघडली आहे. अशा स्थितीत गरीब व आर्थिक दुर्बल घटकातील लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुणे म्हाडामार्फत ही सोडत काढली जात आहे. खरंतर मुंबई म्हाडाकडून स्वस्त घरांची जाहिरात दरवर्षी निघते. पण पुणे म्हाडाकडून पाच सहा वर्षांपूर्वी अशा मोठ्या जाहिराती सहसा निघत नव्हत्या. त्यामुळे गरजू पुणेकरांना नाईलाजास्तव बिल्डर्सकडील महागडी घरं खरेदी करावी लागत होती. पण गेल्या दोन तीन वर्षांपासून पुणे म्हाडाच्या जाहिरातींमध्ये बऱ्यापैकी सातत्य आढळून येतं आहे, ही पुणेकरांसाठी निश्चितच समाधानाची बाब म्हणता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *