महाराष्ट्र 24 । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि. २ एप्रिल । जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्य विभागात मेगा भरती करण्यात येणार आहे. यानुसार या विभागातील एक हजार ५२१ रिक्त पदे तातडीने भरण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेने घेतला आहे. यासाठी येत्या ४ ते ७ एप्रिल या कालावधीत थेट मुलाखती घेतल्या जाणार आहेत. जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी १० ते दुपारी तीन वाजेपर्यंत या मुलाखती घेण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
याबाबतची जाहिरात पुणे जिल्हा परिषदेच्या https://punezp.mkcl.org या
संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या रिक्त पदांमध्ये विशेषतज्ज्ञ
(फिजिशियन), भूलतज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी (ॲलोपॅथी आणि आयुर्वेदिक),
दंतरोग तज्ज्ञ, रुग्णालय व्यवस्थापक, स्टाफ नर्स, एएनएम, क्ष- किरण तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, डाटा एंट्री ऑपरेटर आदींचा समावेश आहे.
ही सर्व पदे कोरोना प्रतिबंधासाठी सुरु करण्यात आलेल्या पुणे जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर, समर्पित कोविड आरोग्य केंद्र आणि समर्पित कोविड
रुग्णालयासाठी असणार आहेत. किमान तीन महिने कालावधीसाठी (आवश्यकतेनुसार कालावधी वाढवणार) कंत्राटी पद्धतीने किंवा मानधन तत्त्वावर भरण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी सांगितले.
यासाठी एम.डी. (मेडिसिन), एम.डी.किंवा डी.एन.बी. (ॲनेस्थेशिया), एम.बी.बी.एस., बी.ए.एम. एस., बी.डी. एस., जी.एन..एम किंवा बी एस्सी
(नर्सिंग), एएनएम., क्ष-किरण तंत्रज्ञ अभ्यासक्रम उत्तीर्ण, बी एस्सी, डीएमएलटी, डी. फार्मसी, बी. फार्मसी आणि पदवीधर उमेदवार पात्र असणार आहेत.
मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे
– वयाचा पुरावा.
– पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र.
– रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र.
– अनुभव प्रमाणपत्र.
– रहिवासी प्रमाणपत्र.
– जातीचे प्रमाणपत्र.
– एक छायाचित्र.
– UPSC मुलाखतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनो, ‘बार्टी’ देणार आर्थिक सहाय्य
पदनिहाय प्रमुख रिक्त जागा
– वैद्यकीय अधिकारी (सर्व मिळून) – ५३७.
– स्टाफ नर्स (परिचारिका) – ४३४.
– एएनएम – २९०.
– प्रयोगशाळा तंत्रज्ञ – १७.
– ईसीजी तंत्रज्ञ – २४.
– क्ष-किरण तंत्रज्ञ – १५.
– रुग्णालय व्यवस्थापक – २७.
– औषधनिर्माता – ३७.
– भूलतज्ज्ञ – २२.
– फिजिशियन – १६.