महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पुणे – दि. २ एप्रिल – पुण्यात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. या पार्श्वभूमीवर संध्याकाळी सहा ते सकाळी सहा दरम्यान संचारबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आणि प्रतिबंधक उपाययोजनांची आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील कौन्सिल हॉल येथे सुरू आहे. बैठकीला स्थानिक लोकप्रतिनिधी व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. यावेळी संध्याकाळी सहा ते सकाळी सहा दरम्यान पुण्यात संचारबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर हॉटेल, मॉल आणि बार दोन आठवडयांसाठी पुर्णपणे बंद असतील तर शाळा आणि महाविद्यालयांना २० पर्यंत सुट्टी राहणार आहे. परंतू पुर्वनियोजित परीक्षा वेळेत घेण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले.
लग्न आणि अंत्यसंस्कार सोडून सर्व कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. पूर्वीचे निर्बंध आहे तसेच राहतील.
# आठवडाभर बार, हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद, फक्त होम डिलिव्हरी सुरू राहणार
# पुण्यातील सार्वजनिक सेवा पुढील सात दिवसांसाठी बंद