महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पुणे – दि. २ एप्रिल – गेले काही दिवस सोने आणि चांदी दरात घसरण दिसत होती दुसरीकडे भांडवली बाजारात तेजी असल्याने सोने आणि चांदी फिकी पडत होती . पण आज शुक्रवारी सोन्याच्या किमतीत ५३० रुपयांची तर चांदीमध्ये १४०० रुपयांची वाढ झाली.
Goodreturns या वेबसाईटनुसार आज शुक्रवारी २२ कॅरेट सोन्याचा भाव ४३९०० रुपये आहे. तर २४ कॅरेटचा भाव ४४९०० रुपये आहे. तर चांदी चा भाव १४०० रुपयेची वाढ होऊन ६५००० रु, प्रतिकिलो आहे .
गेल्या वर्षी सोने चांदी मध्ये गुंतवणूककारांना मोठा फायदा झाला होता. मागील एप्रिल मध्ये ४४००० हजार प्रति तोळा भाव ऑगस्ट मध्ये ५६००० हजार पर्यंत गेला होता . आता एप्रिल २०२१ मध्ये साधारण १० गग्रॅम सोन्यासाठी ४५००० रुपये मोजावे लागत आहेत . तज्ञ च्या अंदाजानुसार दोन वर्षात सोने ६०००० पार करेल, त्यामुळे सोने गुंतवणुकीसाठी हा योग्य काळ आहे.