महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पुणे – दि. २ एप्रिल – माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला आता कोरोनावरील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाच दिवसांपूर्वी सचिनचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर तो घरातच क्वारंटाइन होता, परंतु आता डॉक्टरांनी सचिनला रुग्णालयात दाखल होण्यास सांगिलते. सोशल मीडियाच्या माध्यमातून सचिनने ही माहिती दिली आहे.
“माझ्या तब्येतीसाठी प्रार्थना करणाऱ्या आणि शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार. दक्षता म्हणून मी वैद्यकीय सल्ल्यानुसार रुग्णालयामध्ये दाखल झालो आहे. पुढील काही दिवसांमध्येच मी पुन्हा घरी येईन अशी अपेक्षा आहे. सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा,”.