महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. २ एप्रिल – देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने धोक्याची घंटा ( coronavirus in india ) वाजवली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत देशात आता ७० ते ८० हजारांवर रोज नवीन रुग्ण आढळून येत आहे. यामुळे केंद्र सरकारसह अनेक राज्य सरकारही चिंतेत पडले ( cabinet secretary calls meeting with states ) आहेत. महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश आणि दिल्लीत करोनाचे सर्वाधिक नवीन रुग्ण आढळून येत आहेत. देशात करोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता ६ लाखांवर गेली आहे. यातील १ लाख रुग्ण फक्त गेल्या ४ दिवसांतले आहेत. यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे सरसावली आहेत. अनेक राज्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.
महाराष्ट्रात करोनाचा कहर
महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या वेगाने वाढत ( maharashtra covid cases ) आहेत. रोज ३० ते ३५ हजारांवर पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर आणि ठाण्यासह इतर जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरनाचे रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( uddhav thackeray ) यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
केंद्र सरकारची राज्यांसोबत बैठक
देशात करोनाचा वाढता प्रादुर्भाव हा केंद्र सरकारचे टेन्शन वाढवणारा आहे. यामुळे केद्राने ११ राज्यांसोबत आज बैठक बोलावली आहे. केंद्रीय कॅबिनेट सचिव हे ११ राज्यांच्या प्रतिनिधींसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेणार आहेत. याबैठकीत ते परिस्थितीचा आढवा घेतली. या ११ राज्यांमध्ये करोनाचे रुग्ण मोठ्यासंख्येत आहेत. महाराष्ट्र यात आघाडीवर आहे.