Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
या नगरसेविकेचे पद रद्द ?; टेंडर प्रक्रियेत लाभ मिळवल्याबद्दल केली कारवाई - Maharashtra 24

या नगरसेविकेचे पद रद्द ?; टेंडर प्रक्रियेत लाभ मिळवल्याबद्दल केली कारवाई

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पिंपरी चिंचवड । दि. २ एप्रिल । राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांनी महापालिका कायद्याचे उल्लंघन केल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी जितेंद्र ननावरे यांनी केली होती.. सुलक्षणा शिलवंत-धर यांनी मास्क खरेदी मध्ये पती आणि भाऊ यांना सहभागी केल्याचा आरोप झाला होता. त्यावर त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची तक्रार महापालिकेशी संबंधित आहे. या तक्रार अर्जावर उचित कार्यवाही करावी, अशी सूचना पुणे विभागीय आयुक्तालयातील उपायुक्त डॉ. प्रदिप ठेंगल यांनी महापालिकेला केला आहे.

नगरसेवक पदावर असताना कुटुंबातील सदस्यांना महापालिकेच्या टेंडर प्रक्रियेत सहभागी करून लाभ मिळवल्या बद्दल शिवसेनेच्या जितेंद्र ननावरे यांनी तक्रार केली होती. या तक्रारीवर कारवाई करत सुलक्षणा शिलवंत-धर यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचे तसेच घेतलेले सर्व लाभ रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.नगरसेविका सुलक्षणा शिलवंत – धर यांचे पती तसेच दोन भाऊ संचालक असलेल्या ॲडीसन लाईफ सायन्स कंपनीने पिंपरी-चिंचवड महापालिकेला कोरोना कालावधीत 10 लाखांचे मास्क पुरवले होते. यामुळे महाराष्ट्र महापालिका अधिनियमामधील तरतुदींचा भंग झाल्याचा आरोप करण्यात आला होता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *