महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. ४ एप्रिल – बदाम, काजू, पिस्ते, अंजीर, मनुका, अक्रोड इत्यादी सुकामेवा आपल्या शरीरासाठी अतिशय पोषक आहे हे आपल्याला ठाऊक आहेच. लहान मुलांपासून ते वयस्क व्यक्तींपर्यंत सर्वांसाठीच याचे सेवन उत्तम मानले जाते. मात्र सुकामेवा खाताना हा कोरडाच न खाता रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी खाल्ला जाणे अधिक चांगले मानले गेले आहे.
सुक्या मेव्यामध्ये शरीराला पोषण देणारी अनेक पौष्टिक तत्वे असतात. खाण्याच्या पूर्वी जेव्हा सुकामेवा काही तासांच्या करिता पाण्यामध्ये भिजविला जातो तेव्हा या पाण्यामुळे या सुक्या मेव्यातील फायटिक अॅसिड्स आणि टॅनिन्स निघून जातात. तसेच या सुक्या मेव्यातील एन्झाइम शरीरामध्ये अवशोषित होण्यापासून रोखणारी तत्वे मेवा पाण्यामध्ये भिजविल्याने नाहीशी होऊन सुक्या मेव्यातील ब जीवनसत्व सक्रीय होते.