महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी ।पुणे । दि. ५ एप्रिल । एप्रिल ।सोन्या चांदीची आभूषणे शरीराची शोभा वाढवतात. सणासुदीच्या दिवसांमध्ये सोन्याचांदीच्या आभुषणांचा पेहराव आपल्याकडे शुभ मानला जातो. सोन्याने साठी पार केल्याने सर्वसामान्य जनतेला सोन घेणं शक्य होत नव्हतं. पण आता सोनं पुन्हा पंचेचाळीस च्या आत आलंय. त्यामुळे सोनं खरेदीसाठी पुन्हा गर्दी पाहायला मिळतेय.
गुड रिटर्न वेबसाईट नुसार , १ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४,३९१ इतकी आहे. हा दर काल ४,३९२ इतका होता. ज्यात १ रुपयांनी घट पाहायला मिळाली. १० ग्रॅम सोन्याची किंमत ४३,९१० रुपये आहे. काल ही किंमत ४३,९२० रुपये इतकी होती. यामध्ये सरासरी १० रुपयांची घट पाहायला मिळाली.
२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याची किंमत आज ४,४९१ इतकी आहे. हा दर काल ४,४९२ इतका होता. ज्यात १ रुपयांनी घट पाहायला मिळाली. १० ग्रॅम सोन्याची किंमत ४४, ९१० रुपये आहे. काल ही किंमत ४४,९२० रुपये इतकी होती. यामध्ये सरासरी १० रुपयांची घट पाहायला मिळाली.
चांदीचा भाव प्रतिकिलो ६५००० वर स्थिर आहे .