महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि. ५ एप्रिल । एप्रिलच्या सुरुवातीला मे महिन्याच्या कडक उन्हाचे तीव्र चटके राज्यातील नागरिकांना बसत आहेत. महिन्याच्या सुरुवातीलाच काही जिल्ह्यांमध्ये तापमानानं चाळीशी गाठली आहे. घामाच्या धारा आणि उकाड्यानं नागरिक अक्षरश: हैराण झाले आहेत. आताची ही परिस्थिती आहे तर अजून मे महिना जाणं बाकी आहे. त्यामुळे येत्या काळात हिट वेव येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अकोल्यात 42.1 तर परभणी जिल्ह्यात 41.1 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्याखालोखाल नागपूर आणि गोंदियाचा क्रमांक आहे. नागपुरात 40.2 अंश सेल्सियस तर गोंदियामध्ये 40 अंशावर तापमान पोहोचलं आहे.