5G च्या तुलनेत तब्बल 8000 पट वेगवान असेल 6G

Spread the love

महाराष्ट्र २४ – चीनमध्ये सध्या 6जी टेस्टिंग प्रक्रिया सुरु झाली आहे. चीनच्या सायन्स अँड टेक्नोलॉजी मिनिस्ट्रीने फ्यूचर नेटवर्क डेव्हलपमेंटसाठी योजनेवर काम करण्यास सुरुवात केली आहे.

रिपोर्टनुसार, चीनने 6जी कनेक्टिव्हिटी संबंधित रिसर्चसाठी 2 विभाग बनवले आहेत. यातील एका ग्रुपमध्ये सेक्टर मिनिस्ट्रिज संबंधित लोक आहेत. तर दुसऱ्या ग्रुपमध्ये वेगवेगळ्या युनिवर्सिटी, रिसर्च संस्था आणि टेक्नोलॉजी कंपन्यांशी संबंधित संशोधक आणि तज्ञ असतील.

6जी कनेक्टिव्हिटीशी जोडलेले स्ट्रक्चर तयार झाले आहे. काही तज्ञांचे म्हणणे आहे की 6जी कनेक्टिव्हिटी युजर्सला 1Tbps पर्यंच स्पीड देईल. जे 5जी च्या तुलनेत 8000 पट अधिक वेगवान असेल.

यानुसार, एका सेंकदात 1000 जीबीची फाइल डाउनलोड करणे शक्य होईल. या स्पीडमुळे टेक्नोलॉजी पुर्णपणे बदलून जाईल.

भारतात अद्याप 5जी चे टेस्टिंग सुरु झाले नसून, यासाठी स्पेक्ट्रमची विक्री देखील झालेली नाही. भारतात 2022 पर्यंत 5जी सुरु होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *