महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि. ७ एप्रिल ।सलग दुसऱ्या सत्रात ऑनलाइन शिक्षण सुरू, गेल्या सत्रात शाळेत न जाताच मुले पुढील वर्गात दाखल ऑनलाइन क्लासमुळे मुले शिक्षणाबाबत उदासीन होत आहेत, शाळेबाबत मुलांमधील उत्साह संपत आहे. सर्वकाही ऑटो मोडमध्ये सुरू आहे, आळस वाढला आहे. ८०% मुलांची झोपण्या-उठण्याची, अंघोळ-ब्रशचा रोजची दिनचर्या बिघडली आहे. त्यांना ऑनलाइन क्लासमुळे मिळालेली ढिलाई आवडत आहे. विशेषत: ८ वीपर्यंतच्या मुलांत ही प्रवृत्ती जास्त आहे.
कोरोनामुळे या आठवड्यात देशभरात दुसरे शैक्षणिक सत्र सुरू झाले, त्यात ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. गेल्या सत्रात शाळेत न जाताच सर्व मुलांना पुढील वर्गात प्रवेश मिळाला आहे. गीतांजली म्हणाल्या की, मुलांमध्ये शाळेबाबत उत्साह नाही. काही मुलांना तर शाळेत जाण्याची इच्छाच नाही. त्यांना हा आराम आवडत आहे. शिस्त कमी झाली आहे. वेळापत्रकाचे पालन, नियमित दिनचर्या बिघडली आहे. मुले आळशी होत आहेत. लहानपणातील ही वर्षे आयुष्याचा पाया असतात. सध्या तोच कमकुवत होत आहे.
प्रख्यात मनोवैज्ञानिक डॉ. समीर पारीख म्हणाले की, मुलांनी ही स्थिती मोठ्यांच्या तुलनेत चांगल्या प्रकारे हाताळली. अचानक ऑनलाइन शिक्षणात शिफ्ट होणे सोपे नव्हते, ना शिक्षकांसाठी ना मुलांसाठी, पण सर्वांनी ते स्वीकारले. शाळेतील शिक्षणाच्या तुलनेत ते चांगले नाही, पण झीरो तर राहिले नाहीत. स्थिती आपल्या नियंत्रणात नव्हती. त्यामुळे त्याच्या सकारात्मक पैलूकडे पाहायला हवे. ते आवश्यक आहे कारण कोविड तर आताही आहे. आपल्याला मुलांवर दबाव टाकायचा नाही. त्यांचा मूड बदलला असेल, कधी निराशा वा चिडचिडेपणा दिसला तरी घाबरू नका, हे स्वाभाविक आहे. त्यांच्यासोबत खेळा, शारीरिक अॅक्टिव्हिटी वाढवण्याचा प्रयत्न करा. कला, संगीत, लेखन, वाचन, नृत्य, अभिनय यांसारख्या त्यांच्या छंदाला, आवडीला प्रोत्साहन द्या.