पुण्यात पेटीएम मनीचे इनोव्हेशन केंद्र

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि. ८ एप्रिल । वेल्थ मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म पेटीएम मनीने पुण्यामध्ये तंत्रज्ञान विकासासंदर्भात केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातली योजना कंपनीकडून आखली जात असून या नव्या केंद्रामार्फत 250 जणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. या रोजगाराच्या संधीमध्ये प्रंट एंड, बॅक एंड इंजिनियर्स आणि डाटा वैज्ञानिकांना नोकरी मिळू शकणार आहे. नव्या उत्पादनांवर भर देताना त्यांच्या सेवेकरता केंद्र कार्यरत करण्यात येणार आहे. यात विकासासह कल्पकतेसाठी कार्य करणाऱयांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *