लॉकडाऊनवर एकमताने निर्णय घेऊ- उद्धव ठाकरे; लॉकडाऊन केला तर जनतेचा उद्रेक होईल- देवेंद्र फडणवीस

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि.१० एप्रिल । महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद होत असल्याने Lockdown ला पर्याय नसल्याचे संकेत राज्य सरकारकडून दिले जात होते. त्यानुसार Weeekend Lockdown च्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची एक बैठक आयोजिक केली. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्यातील सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी व्हिडीयो कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातल्या कोरोना स्थिती आणि पुढच्या निर्बंधांबाबत चर्चा केली. राज्यात सतत वाढणाऱ्या Covid-19 संसर्गाची साखळी तोडायची असेल तर सलग 10 किंवा 21 दिवसांचा कडक लॉकडाउन लावण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली. या बैठकीत काय निर्णय होतो याकडे अवघ्या राज्याचं लक्ष होतं.

मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर यांच्याबरोबर दिलीप वळसे पाटील, अशोक चव्हाण, अजित पवार, एकनाथ शिंदे, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, अभिमन्यू काळे, तात्याराव लहाने, दिलीप वळसे, राजेश टोपे, नाना पटोले त्याबरोबर प्रशासकीय अधिकारी सीताराम कुंटेदेखील हजर होते. राज्यातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या लॉकडाउनच्या या प्रस्तावावर सर्व पक्षीय बैठकीत काय चर्चा होते हे महत्त्वाचं ठरणार आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

महिनाभराच्या आत आपण या परीस्थितीवर नियंत्रण मिळवू शकतो… त्यासाठी आपण एकत्र येऊन निर्णय घेतला पाहिजे.
आपल्याला आता एकमुखी निर्णय घ्यावा लागेल.
कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही काही व्यक्तींमध्ये कोविडची लक्षण दिसत आहेत. या संदर्भात मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बोललो आहे.
कोरोनाची साखळी आपल्याला तोडायची आहे. कठोर निर्णय घ्यावा लागेल.
आरोग्य सुविधा वाढवणं गरजेचं आहे. पण आता निर्णय घ्यायची वेळ आली आहे.
मध्यंतरीचा काळ बरा होता. सर्व व्यवहार सुरू झाले होते. पण पुन्हा एकदा संसर्ग सुरू झाला आहे.
आता तर तरुण वर्ग बाधित आढळतोय. आपण सर्वांना लस देण्याची मागणी करत आहोत.

बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

जनतेमधील उद्रेक लक्षात घेऊन नागरिकांच्या दृष्ठीने निर्णय घ्यावा लागेल. काही जण तर आम्ही मलो तरी चालेल पण आम्हाला धंदा करू द्यात असं म्हणणारे आहेत, त्यासाठी आपण अशा लोकांचाही विचार करावा.
कोरोनाची चाचणी केल्यावर रिपोर्ट तात्काळ येतील मिळतील याची व्यवस्था करणं आवश्यक आहे. रेमडेसीविर संदर्भात खासगी हाँस्पिटलमध्ये उपलब्ध नाही. फक्त सरकारी हाँस्पिटलमध्ये उपलब्धता नको खासगी हाँस्पिटलमध्येही हवेत.
रेमडेसीवीर तात्काळ कसे उपलब्ध कसे देता येईल.
सर्व कर आणि कर्ज फेडावं लागत आहे अशा परीस्थित कस घर चालवायचं असा प्रश्न आहे.
ज्यांचं काम सुरू करता येणार नाही त्यांच्यासाठीही काय करता येईल हे देखील पाहावं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *