आठवड्यात सलग २ दिवस बँका बंद; बँकेतील महत्त्वाची कामं उरकून घ्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि.११ एप्रिल । येत्या 13 एप्रिलपासून देशात सलग २ दिवस बँका बंद (Banks will remain closed for २ consecutive days from April 13) राहणार आहेत. त्यामुळे जर बँकेत काही महत्त्वाची कामं प्रलंबित असतील, तर उद्या म्हणजेच सोमवारी (12 एप्रिल) पूर्ण करून घ्या. कारण उद्या कामं पूर्ण नाही केली तर तुम्हाला बराच काळ वाट पाहावी लागेल. खरंतर एप्रिलमध्ये एकूण 9 दिवस बँका बंद राहणार आहेत. तर या आठवड्यात बँका सलग २ दिवस बंद राहणार आहेत. अशा परिस्थितीत बँकाच्या सुट्ट्या लक्षात घेऊन बँकेतील सर्व काम व्यवस्थापित करणं आवश्यक आहे. 

सर्व राज्यात बँकाना एकसमान सुट्ट्या नाहीत. कारण काही सण किंवा उत्सव संपूर्ण देशात एकाच दिवशी साजरा केला केला जात नाही. आरबीआयच्या वेबसाइटवरील उपलब्ध माहितीनुसार, एप्रिल महिन्यात देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये 9 दिवस बँका बंद राहणार आहेत.

बँकेच्या सुट्ट्यांची यादी

– 13 एप्रिल – मंगळवार – उगाडी, तेलगू नवीन वर्ष, बोहाग बिहू, गुढी पाडवा, बैसाखी, बिजू महोत्सव

– 14 एप्रिल – बुधवार – डॉ. आंबेडकर जयंती, सम्राट अशोका जन्मदिन, तमिळ नवीन वर्ष, महा विशुबा संक्रांती, बोहाग बिहू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *