गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर म्हाडाच्या २८९० घरांची सोडत

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि.११ एप्रिल ।पुणे, पिंपरी-चिंचवडसह सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल २ हजार ८९० घरांची सोडत म्हाडा काढण्यात येणार आहे. यात म्हाडाच्या योजनेतील २ हजार १५६ सदनिका व २०% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत उपलब्ध होणाऱ्या ७३४ सदनिका असे एकुण २ हजार ८९० सदनिकांची संगणकीय सोडत पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर काढण्यात येणार आहे. सदर सोडतीचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते होणार आहे.

यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, प्रधान सचिव (गृहनिर्माण विभाग) एस. व्ही. आर. श्रीनिवास, अनिल डिग्गीकर (उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण) आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी ९.०० वाजता अजित पवारांच्या देवगिरी या शासकिय निवासस्थानी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ऑनलाईन पध्दतीने होणार आहे.

दि. १३ एप्रिल २०२१ रोजी दुपारी १२.०० वाजता ते दि. १३ मे २०२१ सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येऊ शकेल. तरी इच्छुकांनी https://lottery.mhada.gov.in तसेच www.mhadamaharashtra.gov.in या संकेत स्थळावर भेट देऊन आपल्या अर्जाची नोंदणी करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *