महाराष्ट्र २४- एसटी महामंडळाच्या ताफ्यात तब्बल सातशे नव्या कोऱ्या बसेस विकत घेण्यासाठी राज्य सरकारने 30 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. नव्या बसमुळे एसटी बसेसचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार असून खासगी व्यावसायिकांबरोबर एसटी महामंडळ सिद्ध होणार आहे.
एसटी महामंडळात मागील तीन-चार वर्षात पाचशे शिवशाही बसेस वगळता नव्यान बसेसची खरेदी झालेली नव्हती. महामंडळाचा तोटा कमी करण्यासाठी जुन्या बसला नवीन रंगरूप देऊन बसेस वापरण्यात येत होत्या. पण प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी 700 नवीन बस खरेदीचा निर्णय घेतला. त्यासाठी राज्य सरकारच्या वतीने निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा मागील वर्षात करण्यात आली मात्र दरम्यानच्या काळात निवडणूक आचारसंहिता लागू झाली होती. त्यामुळे हा निधी रखडण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर राज्य सरकारने सातशे एसटी बसेसच्या खरेदीसाठी 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती.
दिवसाला 100 बसेसची बांधणी
एसटीच्या दापोडी(पुणे), चिकलठाणा(संभाजीनगर), हिंगणा(नागपूर) येथील मध्यवर्ती कार्यशाळेत बसची बांधणी होईल. दिवसाला सरासरी पाच ते सात बसेस याप्रमाणे 100 दिवसात सातशे बसेस बांधण्यात येतील असे सांगणात येते.