महाराष्ट्रात येत्या 48 तासात विजेच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । नागपूर । दि.१४ एप्रिल । राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढच्या दोन दिवसांमध्ये विजेच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूर हवामान विभागानं विदर्भातील अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावू शकतो. सांयकाळी आणि रात्रीच्या वेळी पाऊस विजांच्या कडकडाटासह हजेरी लावण्याची शक्यता आहे. (Nagpur IMD alerts Thunderstorms with lightning and rain in Vidarbha )

महाराष्ट्रात कुठे पाऊस पडणार?
प्रादेशिक हवामान केंद्र , नागपूरच्या अंदाजानुसार 14 आणि 15 एप्रिलला नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती , यवतमाळ भंडारा वाशिम जिल्ह्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. यवतमाळ, वाशिमध्ये 16 एप्रिलला विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

https://twitter.com/RMC_Nagpur/status/1381884071723212800?s=20

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *