मोबाईल गहाळ झाल्यास किंवा चोरी झाल्यास WhatsApp Account असं करा प्रोटेक्ट

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि.१५ एप्रिल ।WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अ‍ॅप आहे. ज्यावेळी इंटरनेट सुरू असतं, त्याचवेळी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर होऊ शकतो. अशात एखाद्या युजरचा स्मार्टफोन हरवल्यास किंवा चोरी झाल्यास आणि दुसऱ्या फोनवर व्हॉट्सअ‍ॅप वापरता येत नसल्यास मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपने काही स्टेप्स सांगितल्या आहेत. ज्याद्वारे फोन चोरी करणारा व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटपर्यंत पोहचू नये आणि त्याचा चुकीचा वापर होण्यापासून बचाव करता येऊ शकतो. युजरला आपलं अकाउंट सुरक्षित करण्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

सर्वात आधी सिम कार्ड लॉक करावं. सिम कार्ड लॉक करण्यासाठी आपल्या नेटवर्क प्रोव्हाडरला कॉल करावा लागेल. त्यानंतर फोनवर अकाउंट परत सेटअप करणं शक्य होणार नाही. सिम कार्ड लॉक झाल्यानंतर युजरकडे दोन पर्याय असतील. आपल्या नव्या फोनवर व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी त्याच नंबरसह एका नव्या सिम कार्डचा वापर करा. चोरी झालेल्या फोनवर आपलं अकाउंट अ‍ॅक्टिव्हेट करण्याचा हा सर्वात जलद पर्याय आहे. व्हॉट्सअ‍ॅप एका वेळी केवळ एका डिव्हाईसवर एका फोन नंबरसह अ‍ॅक्टिव्हेट केलं जाऊ शकतं.

दुसरा पर्याय अकाउंट डिअ‍ॅक्टिव्हेट करण्याचा आहे. असं करण्यासाठी युजरला कंपनीला “Lost/Stolen: Please deactivate my account” असा ईमेल करावा लागेल आणि फोन नंबर आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमध्ये (91) लिहावा लागेल. एकदा डिअ‍ॅक्टिव्हेट झाल्यानंतरही Contacts तुमचं प्रोफाईल पाहू शकतात आणि मेसेज पाठवू शकतात, जे 30 दिवसांपर्यंत Pending State मध्ये राहील. जर युजरने 30 दिवसांपर्यंत अकाउंट सक्रिय केलं नाही, तर ते अकाउंट पूर्णपणे हटवलं जातं.

सिम कार्ड लॉक आणि फोन सर्विस Disabled झाल्यानंतरही, व्हॉट्सअ‍ॅपचा वापर वाय-फायवर केला जाऊ शकतो, जर युजरने कंपनीशी अकाउंट डिअ‍ॅक्टिव्हेटसाठी संपर्क केला नसेल. तसंच जर युजरने Google drive, iCloud किंवा OneDrive चा वापर करुन आधीपासून बॅकअप घेतला असेल, तर तो चॅट हिस्ट्री रिस्टोर करू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *