महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि.१५ एप्रिल । जागतिक बाजारपेठेतील संकेतांमुळे भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या (Gold-Silver Price Today) किमतीत तेजी पाहायला मिळाली. गुरुवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोने दरात (Gold Price) 0.33 टक्के वाढ झाली. तर चांदी दर (Silver Price) 0.31 टक्क्यांनी वधारला. त्यामुळे सोन्याचा भावात 156 रुपयांनी वाढ होऊन, तोळ्याचा भाव 46,764 वर पोहोचला. तर चांदी दरात 207 रुपयांनी वाढ होऊन किलोचा भाव 67,845 इतका झाला.
1 जून 2021 पासून विना हॉलमार्कचे सोन्याचे दागिने विकता येणार नाहीत. गेल्या महिन्यातच याबाबत ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड अर्थात BIS यांनी याबाबतचं नोटिफिकेशन जारी केलं होतं. सोन्याची शुद्धता आता तीन ग्रेडमध्ये होणार आहे. पहिला म्हणजे 22 कॅरेट, दुसरा 18 कॅरेट आणि तिसरा 14 कॅरेट असे हे ग्रेड असतील.
कोरोनाचं संकट, लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यूसारखे नियम यामुळे अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. त्यामुळे लोक पुन्हा एकदा सोन्यातील सुरक्षित गुंतवणुकीचा आधार घेत आहेत. मागील आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (Gold ETF)मध्ये गुंतवणूकदारांनी तब्बल 6,900 कोटी गुंतवले.