सलग पंधरा दिवस इंधनाचे दर स्थिर ठेवल्यानंतर पेट्रोल-डिझेल दरात आज कपात

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि.१५ एप्रिल । सलग पंधरा दिवस इंधनाचे दर स्थिर ठेवल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी गुरुवारी इंधन दरात किरकोळ कपात केली. पेट्रोल दरात 16 पैशांची तर डिझेल दरात 14 पैशांची कपात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जागतिक बाजारात क्रूड तेलाच्या दरात पाच टक्क्यांपेक्षा जास्तची तेजी आलेली असताना इंधन दरात कपात करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून 63 डॉलर्स प्रती बॅरलच्या आसपास असलेले ब्रेंट क्रूड तेलाचे दर आता 66.62 डॉलर्सवर गेले आहेत. दुसरीकडे डब्लूपीआय क्रूड तेलाचे दर 63.03 डॉलर्सवर गेले आहेत. ताज्या दरकपातीनंतर देशाची राजधानी दिल्लीतील पेट्रोलचे प्रतिलीटरचे दर 90.56 रुपयांवरून 90.40 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. दुसरीकडे डिझेलचे दर 80.87 रुपयांवरून 80.73 रुपयापर्यंत खाली आले आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 96.82 तर डिझेलचे दर 87.81 रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *