वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता जूनमध्ये,; वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि.१५ एप्रिल । महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत येत्या 19 एप्रिल पासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मा मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे. या परीक्षा आता येत्या जून मध्ये घेण्यात येणार असून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल.

या परीक्षा पुढे ढकलणे बाबत आपली उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य मंत्री राजेश टोपे, आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही चर्चा झाली आहे, अशी माहितीही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.

राज्यातील कोरोना परिस्थिती ही दिवसेंदिवस गंभीर होत असताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परिक्षाही राज्य सरकारने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या काळजीपोटी आणि कोरनाचा संसर्ग वाढू नये यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *