ठरलं, शुभमन गिल घेणार रोहित शर्माची संघातली जागा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – न्यूझीलंडविरुद्ध टी-२० सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे सलामीवीर रोहित शर्माला भारतीय संघातलं आपलं स्थान गमवावं लागलं. रोहित शर्माच्या जागेवर भारतीय कसोटी संघात युवा शुभमन गिलची भारतीय संघात निवड झाली आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला. भारत अ संघाकडून खेळत असताना कसोटी सामन्यात शुभमन गिलने नाबाद २०४ धावांची खेळी केली. या खेळीमुळे कसोटी मालिकेसाठी शुभमन गिलला प्राधान्य देण्यात आलेलं आहे.

याचसोबत वन-डे मालिकेसाठी मयांक अग्रवालची संघात निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळे मुंबईकर पृथ्वी शॉला वन-डे संघात सलामीला येण्याची संधी मिळू शकते. शिखर धवनऐवजी पृथ्वी शॉची भारतीय संघात निवड करण्यात आलेली आहे. बुधवारपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वन-डे मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे रोहितच्या अनुपस्थितीत भारतीय संघ न्यूझीलंडचं आव्हान कसं पेलवतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *