जगाला पीडीएफची भेट देणारा काळाच्या पडद्याआड

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । नवीदिल्ली । दि.१९ एप्रिल । एडोब या सॉफ्टवेअर कंपनीचे सह-संस्थापक आणि ‘पोर्टेबल डॉक्यूमेंट फॉर्मेट’ (पीडीएफ) तंत्रज्ञानाचा विकास करणारे चार्ल्स ‘चक’ गेश्की यांचे निधन झाले आहे. निधनासमयी ते 81 वर्षांचे होते. एडोब कंपनीनुसार गेश्की यांचे शुक्रवारी निधन झाले आहेत. ते सॅन फ्रान्सिस्कोच्या बे एरियाच्या लॉस आल्टोस उपनगरात राहत होते.

पूर्ण एडोब समुदाय आणि तंत्रज्ञान जगतासाठी हे मोठे नुकसान आहे. गेश्की हे कित्येक दशकांपर्यंत मार्गदर्शक आणि नायक राहिले. एडोबचे सह-संस्थापक म्हणून चक आणि जॉन वार्नोक यांनी एक क्रांतिकारी सॉफ्टवेअर तयार केले होते असे उद्गार एडोबचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू नारायण यांनी कंपनीच्या कर्मचाऱयांना पाठविलेल्या ईमेलमध्ये काढले आहेत.

चक यांनी कंपनीत नवोन्मेषासाठी अथक प्रयत्न केले, याचाच परिणाम म्हणून पीडीएफ, एक्रोबेट, इलस्ट्रेटर, प्रीमियर प्रो आणि फोटोशॉप यासारखे मोठी क्रांतिकारक सॉफ्टवेअर्स तयार झाल्याचे नारायण यांनी म्हटले आहे.

गेश्की यांना स्वतःच्या कुटुंबाबद्दल गर्व होते असे उद्गार त्यांची पत्नी नॅन्सी यांनी काढले आहेत. 2009 साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी गेश्की आणि वार्नोक यांना नॅशनल मेडल ऑफ टेक्नॉलॉजीने गौरविले होते.

1992 मध्ये गेश्की यांच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला होता, पण ते बचावले होते. कामावर जाताना गेश्की यांच्यावर दोन जणांनी बंदूक रोखून त्यांना हॉलिस्टर येथे नेले होते. तेथे त्यांना 4 दिवसांपर्यंत ठेवण्यात आले होते. याप्रकरणी एका संशयिताला 6 लाख 50 हजार डॉलर्सच्या खंडणीच्या रकमेसह पकडण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *