महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.१९ एप्रिल । वॉशिंग्टन । अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी जगातील आतापर्यंतचा सर्वात पांढरा रंग बनवण्यात यश मिळवले आहे. तो जगात उपलब्ध पांढऱ्या रंगात सर्वाधिक पांढरा आणि चमकदार असल्याचा त्यांचा दावा आहे. तो अमेरिकेच्या पर्ड्य् विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी बनवला आहे. विशेष म्हणजे हा अल्ट्रा व्हाइट रंग सूर्यप्रकाश ९८% पर्यंत परावर्तित करतो. घरातील उष्णता कमी होणार असल्यामुळे वीज बचत होईल आणि वातावरण बदलावरही कमी परिणाम होईल. एवढेच नव्हे तर घरांचे तापमान ८ पट कमी करेल .संशोधनाचे प्रमुख प्रा. शियूलिन रुआन सांगतात की, बाजारात विक्री होत असलेले रंग सूर्यप्रकाश ८०-९०% पर्यंत परावर्तित करतात.
संशोधनाचे प्रमुख प्रा. शियूलिन रुआन सांगतात की, बाजारात विक्री होत असलेले रंग सूर्यप्रकाश ८०-९०% पर्यंत परावर्तित करतात. फक्त १% परावर्तनामुळे १० व्हॅट चौरस मीटर भागातील उष्णता कमी होते. नव्या रंगामुळे सुमारे ८ पटपर्यंत फरक होईल, जर एक हजार चौरस मीटर भागात हा रंग लावला तर त्यातून सुमारे १० किलो व्हॅट कूलिंग पॉवर मिळेल, जी बहुतांश घरात वापरल्या जाणाऱ्या सेंट्रल एअर कंडिशनरच्या तुलनेत जास्त प्रभावी आहे.